रत्नागिरी:-नुकतीच बारगळलेली जिल्हा प्रशासनाची आपले सरकार आणि दाखल्याच्या वेबसाईटला आता पुन्हा गती मिळाली आहे. शाळा कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात होणारी नागरीकांची गर्दी आता कमी होवु लागली आहे. दाखले वेळेवर मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सेवेत आणखी तिन पोर्टल सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दाखले मिळण्याचा वेगही वाढल्याचे दिसत आहे.
दरवर्षी प्रमाणे शाळा-कॉलेजच्या प्रवेश प्रकीया सुरु झाल्याबरोबर तालुक्यातील सेतु कार्यालयाबाहेर विविध दाखल्यांसाठी नागरीकानी रांगा लावण्यास सुरुवात केली होती. दाखले देण्यासाठी ‘फिफो’ ही वेबसाईट उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र काही आठवड्यांमध्येच ही वेबसाईट शासनाला बंद करावी लागली. या वेबसाईटवर आलेली अर्जांची गर्दी आणि वेबसाईट सुरु होण्यास लागणारा वेळ याची सांगड न बसल्याने वेबसाईटवर पेंडींग अर्जाची संख्या वाढु लागली. त्यामुळे शासनाला ही वेबसाईट बंद करावी लागली होती.
मात्र नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने तांत्रीक टिमला या समस्येचे निराकरण करण्यासाठी सुचना दिल्या होत्या.
दाखल्यांसदर्भात येणारी ही तांत्रीक समस्या अचानक दाखल्यांसाठी वाढलेले अर्ज आणि एकाचवेळी होणारा वेबसाईटचा वापर यामुळे शासनाच्या या वेबसाईटला अनेक तांत्रीक अडचणी येत होत्या. ही तांत्रीक समस्या फक्त रत्नागिरी जिल्ह्याची नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात उद्भावत होती. याबाबतचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक यांनी मुंबईच्या तांत्रीक टिमला समस्येबाबत माहीती कळवली. कार्यालयीन वेळेत या वेबसाईटवर येणारा ताण लक्षात घेता या तांत्रीक टिमने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी संबंधित वेबसाईटच्या दुरुस्तीचे काम केले. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे वाढते कामकाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलची संख्या वाढवण्यात आली आहे. जिल्हा पशासनाच्या महसुल विभागात आधी कार्यरत असलेलया तिन पोर्टल सोबत अधिकचे दोन पोर्टल आणि आपले सेवा केंद्र संदर्भातील आधी असलेल्या चार पोर्टलसोबत अधिकचे दोन पोर्टल असे एकुण पाच पोर्टल वाढवण्यात आले आहेत.
त्याचबरोबर आता अधिकाऱ्यांच्या डिजीटल सही सोबतच डेस्क ऑफीसर यांनाही दाखल्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक दाखल्यासाठी नवीन लॉगीन न करता आता एकाच वेळी जास्तीत जास्त दाखले मंजुर करता येणं शक्य होत आहे.