खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील खोपी-गोरेवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून 54 हजार 750 रूपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी बाबू बाळाजी गोरे याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबू गोरे हा जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू गाळून साठा केला असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन दारूचा अड्डा उद्धवस्त केला. या धाडीत 5 कॅनमध्ये 175 लिटर व 31 हजार 500 रूपये किंमती गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. 500 लिटर मापाच्या 3 प्लास्टिकच्या सिन्टेक्स टाक्या, गुळ नवसागर मिश्रित तयार केलेले कुजके रसायन, एक मध्यम आकारी 750 लिटर मापी लोखंडी टाकी, 500 लिटर क्षमताया पाण्याने भरलेल्या 13 सिन्टेक्सच्या टाक्या व इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले.