जिल्हा काँग्रेस सामाजिक न्याय विभागच्यावतीने प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी:- महावितरणकडून आलेली वाढीव विज बिले रद्द करा तसेच जात पडताळणी, उत्पन्नाचे दाखले, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला तसेच सिव्हील हॉस्पिटल मधील अस्वच्छता आणि दुर्गंधी तातडीने दूर करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस सामाजिक न्याय विभागच्यावतीने करण्यात आली आहे. या समस्यांचे निराकरण न झाल्यास सफाई आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी 4 जुलै रोजी अशोकराव जाधव, अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे नेतृत्वाखाली वाढीव विजबिले रद्द करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच जात पडताळणी, उत्पन्नाचे दाखले, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉन क्रिमीलेआरचा दाखला लोकांना तातडीने दिले जावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच सिव्हील हॉस्पिटल मधील अस्वच्छता, आणि दुर्गंधी नष्ट करावी अशी तीन निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.
त्यावेळी सामाजिक न्याय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ किल्लेदार, शेतकरी कष्टकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उत्तम गायकवाड, हारीष शेकासन उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा प्रभारी रतनागिरी तालुका, रमेश शहा रलागिरी शहर काँग्रेस अध्यक्ष, शरद कापसे, विश्वभंर भाटकर, सुभाष डोर्लेकर, प्रकाश साळवी, दिपक साळवी, अविनाश विचारे, प्रशांत कदम, रमेश थरवळ, चंद्रकांत चव्हाण, रमाकांत पवार आणि अन्य उपस्थित होते.