जाकादेवी/ वार्ताहर:-जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याकडे केवळ अर्थव्यवस्थेतिल एक घटक म्हणून न पाहता पाण्याची उपलब्धता,गुणवत्ता आणि जीवनावश्यकता यावर भर द्यावा, असे प्रतिपादन खालगांवचे धडाडीचे सरपंच प्रकाश खोल्ये यांचे प्रतिपादन केले.
ग्रामपंचायत स्तरावरील विविध भागधारकांचे प्रशिक्षण ग्रामपंचायत खालगांव , येथे जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत सतरांवरील विविध भागधारकांचा योजनेच्या नियोजन, अंमलंबजावणी व देखभाल – दुरूस्ती टप्प्यावर सहभाग वाढवा तसेच गांवस्तरावर पाण्याचे सुयोग्य नियोजन व्हावे यासाठी सदरच्या प्रशिक्षणासाठी सरपंच , आशा सेविका , अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्य याना प्रशिक्षणासाठी एकूण १३ ग्रामपंचायतीमधील विविध संवर्गातील कर्मचारी व पदाधिकारी पाचारण करणेत आले होते.
प्रशिक्षणमध्ये योजनाची देखभाल – दुरूस्ती व हंस्तारंण प्रक्रिया, पाईपचे प्रकार व फिटींग , पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता, ग्रामिण पाणी पुरवठा समितीच्या जबाबदारी व कर्तव्य , पाणी गुणवत्ता व त्यांचे महत्त्व विविध तपासणी व त्यांचे प्रात्यक्षिक, पंपाचे प्रकार व प्रतिबंधात्मक उपाय-योजना इ.विषय तज्ञ मार्गदर्शकानी घेतले. सदरच्या प्रशिक्षणाची सुरवात खालगांव ग्रामपंचायतीनचे सरपंच श्री.प्रकाश खोल्ये यांनी प्रशिक्षणार्थीना जल प्रतिज्ञेनेची शपथ देवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये पाण्याकडे केवळ अर्थव्यवस्थेतिल एक घटक म्हणून न पहाता पाण्याची उपलब्धता , गुणवत्ता आणि जिवनावश्यकता यावर भर देवून धोरणात्मक दृष्टिकोनातून सर्व ग्रामस्थांनी जल जीवन मिशन अंतर्गत लोकवर्गणी भरावी, असे आवाहन केले.
सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपञ देवून सांगता करण्यात आली. यावेळी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. संके व त्याची टिम , तसेच जिल्हास्तरावरून जिल्हा सुलभीकरण वर्ग उपस्थित होता.सदरचा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे आयोजित करण्यात आला होता.