पावसाळ्यात जनावरांना विविध परजीवींचा प्रादुर्भाव होत असतो. या परजींना मोठ्या जनावरांसोबतच लहान वासरेसुद्धा बळी पडतात.
विविध परंजीवींपैकी लहान वासरांना जर जंताची लागण झाली तर वासराच्या विष्ठेतून आणि त्या विष्ठेच्या भौतिक गुणधर्मावरून तीन प्रकारचे आजार होतात.
यामध्ये प्रामुख्याने टॉक्सोकॅरा व्हिटुलोरम, रक्ती हगवण (कॉक्सीडीओसिस)आणि क्रिप्टोस्पोरीडीयम (झुनोटिक आजार) यांचा समावेश होतो. टॉक्सोक्यारा व्हिटुलोरम या आजारात लहान वासरे दगावतात.
टॉक्सोक्यारा व्हिटुलोरम हा जन्मानंतर लगेचच वासरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा कृमिजन्य आजार आहे. नवजात वासरांना आईच्या गर्भाशयात असतानाच जंताची लागण होते.
वासराच्या जन्मानंतर वयाच्या सातव्या दिवसापासूनच हे कृमी असंख्य संख्येने आतड्यामध्ये तयार होतात. त्यांची लांबी अर्धा फुटापर्यंत असते. या जंताच्या वेटोळ्यांमुळे वासराच्या पोटातील आतड्याची हालचाल मंदावते.
Animal Diseases : या आजारामुळे होऊ शकतो जनावराचा अचानक गर्भपात
वासरांना जंताची लागण झाल्यास आवमिश्रित हगवण लागते. वासराला मातीच्या रंगाची रक्त मिश्रित, घाण वास येणारी विष्ठा होते.
आतडी पूर्णपणे घट्ट झाल्यामुळे वासरांना विष्ठा होत नाही. वासरे पाठीमधून कण्हत सतत विष्ठा टाकण्याचा प्रयत्न करतात.
उपाय काय आहेत ?
वासरांना वयाच्या सातव्या दिवशी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पहिली जंतनाशकाची मात्रा द्यावी.