टोमॅटो – 100 रुपये, मिरची – 120 रुपये किलो
रत्नागिरी:-महागाईने सर्वसामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला आलेल्या असताना आता भाजीपाल्याने गृहिणींना झटका दिला आहे. बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पावसामुळे घाटमाथ्यावरून येणारा भाजीपाला कमी प्रमाणात येत असल्याने दर वाढले आहेत.
स्वयंपाकात आवश्यक असणारा टोमॅटो महाग झाला आहे. तर मिरचीने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. श्रावण महिन्यात चढ्या दराने मिळणारा भाजीपाला आता पावसाच्या सुरुवातीलाच महाग मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य आता मेटाकुटीला आला आहे.
बाजारातील दर
▪️टोमॅटो – 100 रुपये किलो
▪️मिरची – 120 रुपये किलो
▪️मेथी – 20 रुपये
▪️कोथिंबीर – 40 रुपये
▪️ आल – 200 रुपये किलो दराने बाजारात मिळत आहे.