राजापूर: राजापुरात किरकोळ कारणावरून सरपंचावर कोयतीने वार केल्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश हरीचंद्र गुरव (५०) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पेंडखले वठारवाडी येथे घडली. या प्रकरणी राजापूर पोलीसानी दत्ताराम महादेव सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सरपंच राजेश गुरव यान्ना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पेंडखले गावचे सरपंच राजेश हरीश्चंद्र गुरव यांच्या गावातील वठारवाडी येथील जमीनी भोवती घातलेले कुंपण त्याच वाडीतील दत्ताराम महादेव उर्फ डी एम सुर्व हे तोडीत असतानाच सरपंच राजेश गुरव हे नेमके त्याच वेळी आपल्या बाईकवरुन तेथुन चालले होते त्यावेळी आपले कुंपण तोडले जात असल्याचे त्यांनी पाहिले आणि बाईक थांबवुन त्यांनी दत्ताराम सुर्वे यांच्याकडे आपले कुंपण का तोडता अशी विचारणा केली त्यावेळी दोघात वादावादी झाली आणि अचानक दत्ताराम सुर्वे यांनी हातातील कोयतीने सरपंच गुरव यांच्यावर वार केला.
त्यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम झाली झालेल्या हल्ल्यात ते बाईकसह खाली कोसळले त्यानंतर सुर्वे यांनी कोयतीच्या विरुध्द बाजुने गुरव यांच्या खांद्यावर मारहाण केली झालेल्या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील सरपंच राजेश गुरव यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले.
दरम्यान सरपंच गुरव यांच्यावर हल्ला करणारे दत्ताराम सुर्वे यांच्या विरुध्द भादवि कलम ३२४ ,५०४ ,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यात वापरण्यात आलेली कोयती पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती राजापूर पोलीसान्नी दिली. दरम्यान या दत्ताराम सुर्वे यांच्या पत्नीला धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार त्यांच्याकडुन पोलीसांत करण्यात आली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे हेडकॉंस्टेबल के एस पाटील अधिक तपास करीत आहेत .