रत्नागिरी:- 56 व्या युवा महोत्सवाच्या तयारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 38 महाविद्यालये सांस्कृतिक कार्यशाळेला उपस्थित होती.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ.सुनील पाटील यांच्या मार्गद्शनाखाली मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री निलेश सावे आणि इतर 7 प्रशिक्षक रत्नागिरी जिल्ह्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन केले होते.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगिकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल दत्त कुलकर्णी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर ,डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई विद्यापीठाच्या संघामध्ये कायमच गुणी कलाकार सहभागी होत असतात आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत असतात रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी कलाकार अतिशय कष्टाळू मेहनती आणि नैसर्गिक कलागुणांमुळे मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव सादर होत असताना विशेष लक्षणीय असतात असे श्री निलेश सावे यांनी उद्गगार काढले.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी युवा महोत्सव कायमच मार्गदर्शन करतो.ऊर्जा देतो यासाठी सर्व प्राध्यापकाने सकारात्मक प्रयत्न करूया असे आवाहन डॉ आनंद आंबेकर जिल्हा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठ केले आहे.
नवीन शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागात आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि यासाठी नुकतेच स्वायत्त झालेले गोगटे जोगळेकर महाविद्यालय विशेष प्रयत्न करत आहे असे डॉ.प्रफुल्ल दत्त कुलकर्णी यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियातून युवा महोत्सवातून आपली संपूर्ण जीवन पद्धती बदलते असे आवर्जून सांगितले.युवा महोत्सवासाठी पाच तासाच्या कार्यशाळेनंतर सकारात्मक ऊर्जा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ.आनंद आंबेकर सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापकांनी केले .सूत्रसंचालन प्राध्यापिका रसिका नाचणकर यांनी केले.