रत्नागिरी:- सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरचा पाचवा वर्धापनदिन येत्या शनिवारी (दि. ८ जुलै) रत्नागिरीत होणार आहे.
मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना ब्रिज इंजिनीअर माधवराव भिडे यांनी १७ डिसेंबर २००० रोजी मुंबईत केली.
मराठी उद्योजकांनी महिन्यातून किमान दोन वेळा एकत्र यावे, उद्योगाविषयी गप्पा माराव्यात, सहकार्याची भावना परस्परात रुजवावी, मैत्रीचे पूल बांधावेत आणि नवीन मराठी उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हे सॅटर्डे क्लबचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यात या क्लबचे ८० चाप्टर (विभाग) असून तीन हजाराहून अधिक उद्योजक क्लबशी बांधले गेले आहेत. त्यापैकी रत्नागिरी चाप्टरचा पाचवा वर्धापन दिन येत्या शनिवारी (दि. ८ जुलै) सायंकाळी रत्नागिरीत मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये साजरा होणार आहे. समारंभात क्लबच्या इतर चाप्टरमधील उद्योजक सदस्यही सहभागी होणार आहेत.
या समारंभाकरिता मुख्य अतिथी सांगलीतील चिंतामणी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल साठे व्यवसायविषयक मार्गदर्शन करणार आहेत. कोकणातील मसालाकिंग अशी ओळख असलेले गुहागर येथील खातू मसाले उद्योगाचे संचालक शाळिग्राम खातू यांची मुलाखत यावेळी घेतली जाणार आहे.
रत्नागिरीसह जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजकांनी या समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समारंभातील उपस्थितीच्या नोंदणीकरिता 9665299329 किंवा 9130630260 या क्रमांकावर संपर्क साधावा.