खेड(सुदर्शन जाधव)-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरा पालगड गावातील ग्रामीण विकास मंडळ घेरा पालगड शिंदेवाडी यांच्या माध्यमातून मागील चार महिन्यापासून आपल्या गावात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.”पाणी आडवा पाणी जिरवा” हे उद्दिष्ट ठेवून शिंदेवाडी च्या वरील बाजूस डोंगर माथ्यावर असलेल्या मोकळ्या जागेवर सीसीटी म्हणजे समतल चर बोलतात जेणेकरून या सरांमध्ये पावसाचे पाणी साचून ते पाणी जमिनीमध्ये झिरपल्याने पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
तसेच कमजोर झालेले जलस्रोत पूर्ववत होतात यासाठीच हे काम करण्यात आले.ग्राम विकास मंडळ घेरा पालगड शिंदेवाडी येथील ग्रामस्थ आणि चाकारमानी लोकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन भव्य दिव्य असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला.
रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेला आमंत्रित करण्यात आले होते.तसेच दापोली मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेश दादा कदम, जिल्हा परिषद सदस्य श्री.अरुण (अण्णा) कदम,स.तु.कदम (समाजसेवक),झोलाई देवी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री यशवंत तुकाराम कदम,तसेच वनविभाग अधिकारी,कृषी अधिकारी, ग्रामसेवक,तलाठी,सरपंच,सदस्य, इतर राजकीय नेते आणि ग्रामस्थ, मुंबई,पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली.तत्पूर्वी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले..
त्यानंतर चहा,नाश्ता झाला आणि लगेचच मिशन वृक्षारोपण साठी सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळ आणि बालक वर्ग यांनी डोंगर माथ्यावर ज्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे होते.
त्या ठिकाणी आंबा,काजू,आवळा, खैर,साग,बेल,जांभूळ या प्रकारचे झाडे लावण्यात आली.या ठिकाणी झालेल्या काम फक्त आमच्यासाठी वीस टक्के आहे तेव्हा अजूनही आम्हाला काम करायचे आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.आम्ही सतत पुढील तीन वर्ष हे काम सुरूच ठेवणार भविष्यात आमच्या गावाला कोणताही पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही त्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
या कामासाठी या गावच्या माहेरवाशीने तसेच पाणी फाउंडेशन च्या (नंदाताई) सौ. मंजिरी मोरे यांची महत्त्वाची भूमिका आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली, जगदीश दादा शिंदे यांच्या पुढाकाराने हे काम होत झाले आहे.जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात श्री.नितिन जाधव,श्री सचिन काते,श्री.वसंत मोरे,श्री.चंद्रकांत मोरे,श्री.दीपक सकपाळ,श्री प्रवीण साळुंखे,श्री. आतीश गोठल,श्री.किशोरजी ठसाल,श्री.रुपेश काते,श्री.सतीश जाधव,श्री.सुदर्शन जाधव,श्री. सचिन म्हादलेकर,कुमार मंथन जाधव,कुमार रुद्र काते हे सर्व यामध्ये सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने जगदीश दादा शिंदे यांनी सहभागी झालेल्या सगळ्यांचे आभार मानले.