रत्नागिरी:- शहरातील भाट्ये येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा. शहर पोलिसांकडून छापा टाकून ही कारवाई करण्यात आल़ी. संशयित बियरची बाटली पुढ्यात ठेवून बसलेले पोलिसांना आढळले होत़े. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांकडून महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
भाट्ये येथे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू पिण्यात येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होत़ी. या प्रकाराची दखल घेत पोलिसांकडून शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आल़ी. यावेळी सर्पराज अलिमियाँ होडेकर (40) व शशिकुमार सदाशिव आग्रे (55) यांच्या ताब्यात पिण्यासाठीची बियरची बाटली पोलिसांना आढळल़ी. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू प्रतिबंध कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.