खेड:- तालुक्यातील लोटे येथील कोकरे महाराज गो-शाळेतील दत्ताराम बलवान सकपाळ या 70 वर्षीय वृद्धाचा रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्ताराम सकपाळ यांना श्वास घेण्यास त्रास होता. उपचारासाठी कामथे येथील शासकीय रूग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर औषधोपार सुरू असताना मृत्यू झाला.