दापोली: तालुक्यातील कोळथरे येथे वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे एका शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सुबोध कोझरेकर यांच्या बागेतील 5 मोठे माड मोडून पडले तर दोन माड उन्मळून पडले, तर एक सुरूचे झाड कोसळले. त्यामुळे आणखी 3 माड मोडले. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.