चिपळूण: शहरातील पाग येथून गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमित चंद्रकांत लटके (पाग) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लटके हा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यानुसार त्यांनी पाग-ब्राम्हणवाडीच्यामागे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी गोठ्यासमोर चाऱ्याच्या शेडमध्ये तपासणी केली असता एका प्लास्टीक पिशवीत तपकिरी रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेला ओलसर 644 ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. जवळपास 27 हजार 800 रुपये किंमतीचा असलेला गांजा तसेच 500 रुपये किंमतीचा इलेक्ट्रीक काटा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी लटके याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
शनिवारी त्याची पोलीस कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.