रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथील वळणावर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. मात्र ट्रक चालकाने बाहेर उडी मारल्याने चालक बचावला. हा अपघात शनिवार 1 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे की, गोव्याहून मुंबईच्या दिशेने मालवाहू ट्रक (एमएच 19, एए 8427) चालला होता. निवळी घाटातील वळणावर ट्रक चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक डिव्हायडर तोडून विरुध्द दिशेला जाऊन दरीत कोसळला. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रक बाहेर उडी मारल्याने तो बचावला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते.