राजवाडे यांचे नाव अन्य ठिकाणी देऊन मातृमंदिर चौक हे नाव पूर्ववत करण्याची विनंती
देवरुख:-मातृ मंदिर संस्थेशी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेकांच्या भावना जोडल्या असल्याने मातृमंदिर चौकाचे बदललेले नाव रद्द करून सदर चौकाचे नाव मातृमंदिर चौक असेच ठेवण्यात यावे अशी मागणी देवरूख ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर मंगेश कांगणे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात केली आहे
देवरुख नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे यांनी म्हटले आहे की,मातृ मंदिर आणि मातृ मंदिर चौक हे देवरुख शहराची ओळख आहे. देवरुख शहर आणि आजूबाजूच्या लोकांच्या भावना मातृ मंदिर सोबत जोडल्या गेल्या आहेत.
परिणामी मातृ मंदिर चौकाचे लक्ष्मीबाई राजवाडे असे बदलण्यात आलेले नामकरण रद्द करून पुन्हा या चौकाचे नामकरण मातृ मंदिर चौक असेच ठेवण्यात यावे अशी लेखी मागणी डॉ.कांगणे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
सदर चौकाचे नव्याने करण्यात आलेले कै.लक्ष्मीबाई राजवाडे चौक हे नाव बदलून मातृमंदिर चौक करावे व राजवाडे यांच्या कर्तुत्वास सन्मान देण्यासाठी अन्य रस्ता अथवा चौकास त्यांचे नाव देण्यास आमची हरकत नाही असेही डॉ. मंगेश कांगणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
देवरुख शहराची ओळख असणाऱ्या व अनेकांच्या भावना जोडल्या गेलेल्या मातृ मंदिर चौकाचे नामकरण कृपया बदलू नये अशी विनंती डॉक्टर कांगणे यांनी देवरूखवासी जनतेच्या वतीने केली आहे.