संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे दुचाकी आणि कंटेनरचा अपघात झाला. बुधवारी दुपारी हा अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार पवन कांबळे ( राहणार, सध्या वांद्री- गजापुर तालुका शाहूवाडी) हा धाब्यावर दुपारी जेवणासाठी आला होता. जेवण घेऊन आपल्या क्रेशरवर परतत असताना रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने त्याला धडक दिली. कंटेनरच्या पुढच्या टायरमध्ये दुचाकी अडकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. सुदैवाने दुचाकीस्वार कंटेनरच्या टायरखाली येण्यापासून वाचला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात दुचाकी चालक कांबळे यांच्या पायाला मार लागला असून रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.