संगमेश्वर – नावडी येथील समाजसेवक दिनेश हरीभाऊ आंब्रे यांची कायदासाथी (अधिकार मित्र) म्हणुन नवनियुक्ती नुकतीच झाली आहे. या मुळे संगमेश्वर तालुका परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
या निमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिवसेना (शिंदेगट) विभाग प्रमुख (नावडी) श्री. संजय खातु,संगमेश्वर शाखा प्रमुख संजय कदम, महिला विभाग प्रमुख आर्या मयेकर, महिला शाखा प्रमुख नम्रता शेट्ये, उप शाखा प्रमुख नयनाताई शेट्ये, तसेच सानिका कदम, सुप्रिया कदम, ओंकार भिडे,गौरव सुर्वे आदि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी सौं शीतल आंब्रे उपस्थित होत्या.
नावडी येथे शिवसेना (शिंदेगट) कार्यकर्त्यांकडून ‘कायदासाथी’ दिनेश आंब्रे यांचा सन्मान
