रत्नागिरी : थिवीम ते हजरत निजामुद्दीन असा रेल्वे प्रवास करत असलेला धन दामर चेत्री (वय ३३, रा. गाव लकला, पोस्ट लकला, जि. तिनसुळिया, राज्य आसाम) या तरुणाचा रत्नागिरी तालुक्यातील चिंद्रवली येथे पडून मृत्यू झाला. ही घटना १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपूर्वी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धन दामर चेत्री हा युवक रेल्वेने प्रवास करत असताना निवसर रेल्वे स्टेशनवर उतरला. त्यानंतर तो रेल्वे स्टेशनच्या विरुद्ध बाजूला असलेल्या चिंद्रवली कोनी येथील प्रकाश जोशी यांच्या काजूच्या बागेजवळून पायी जात होता. याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. धन दामर चेत्री याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
निवसर येथे रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
