देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव पठारवाडी येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा साडीने पेट घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रभागा शंकर खेडेकर असे त्यांचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा खेडेकर या १ एप्रिल रोजी घरी आंघोळीसाठी पाणी गरम करत होत्या. चुलीतील विस्तवाजवळ शेकोटी घेत असताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. या आगीत त्यांच्या पाठीचा भाग आणि दोन्ही हात भाजले. त्यांच्या मुलांनी तातडीने त्यांना देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवले.
चंद्रभागा यांना १ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र १३ एप्रिल रोजी रात्री १०.१५ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती चंद्रभागा यांच्या मुलांनी देवरुख पोलिसांना दिली. देवरुख पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
देवरुख : शेकोटी घेताना साडीने पेट घेतल्याने वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
