भीषण अपघातात कंटेनरचे झाले दोन भाग
खेड / पतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस वाहतुक टँकर उलटला. अपघाताने गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. अपघातग्रस्त कंटेनरचे दोन भाग होवून चालकाकडील भाग पूर्णपणे वेगळा झाला. वेगळा झालेला दर्शनी भाग बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. सोमवारी सकाळच्या सुमारास गॅसने भरलेली टाकी बाजूला हटवण्याचे काम हाती घेण्यात आले.
चालक सत्येंद्रकुमार हा आपल्या ताब्यातील कंटेनरमधून (जी.जे. ए.एक्स. 5184) गॅस घेवून मुंबईतून गोव्याच्या दिशेने जात होता. भरणे जगबुडी पुलानजीक आला असता नियंत्रण सुटल्याने उलटला.
अपघातप्रवण क्षेत्राजवळ घडलेल्या अपघातामुळे पुलाच्या भिंतीची नासधूस झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरचे दोन तुकडे झाले. रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. अपघातात चालकास किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
खेड : जगबुडी पुलावर गॅस वाहू कंटेनर पलटी, चालक जखमी
