रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारांची स्वच्छता रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश गटारे बंद आहेत; मात्र तरीही काही ठिकाणी नागरिकांकडून टाकल्या जात असल्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी नागरी वस्तीत भरण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून नाले, गटारांची सफाई केली जात आहे.
शहरात मुख्य सहा नाले असून, या नाल्यात शहरातील गटारांचे पाणी सोडण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातून गटारे बंदिस्त करण्यात आली आहे. तरी काही ठिकाणी गटाराच्या तोंडावर कचरा प्लास्टिक पिशव्यात भरून नागरिकांकडून टाकला जात आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबण्याचा धोका आहे. त्यात पावसाचे पाण्यामुळे शहरातील सखल भागातील नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे सावधानता म्हणून नगर परिषदेने सफाई सुरू केली आहे. गटारांची सफाई करून नंतर नाल्यांची सफाई केली जाणार आहे. सफाई कर्मचारीच सफाई करत असल्याने स्वतंत्र निधीची आवश्यकता भासत नाही.
नालेसफाईला कधीपासून सुरुवात केली ?
वास्तविक सातत्याने नालेसफाई सुरू असते. परंतु, पावसाळ्यामुळे दि. १ एप्रिलपासून सफाई सुरू केली आहे.
कचऱ्यामुळे धोका
प्लास्टिक पिशवीतून कचरा गटारात फेकला जात असल्यामुळे गटारे तुंबण्याचा धोका असतो. त्यामुळे गटारे, नाले स्वच्छ करणे आवश्यक आहे. वास्तविक शहरात सतत सफाई मोहीम सुरू असली तरी पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून सफाई केली जात आहे.
शहरात किती नाले?
रत्नागिरी शहरात मुख्य सहा नाले आहेत. या नाल्यांमध्ये शहरातील गटारांचे पाणी सोडण्यात आले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेकडून नाले, गटारांची स्वच्छता सुरू
