राजापूर : तालुक्यातील वडदहसोळ पळसमकरवाडी येथील कोडवी शिवारात ७५ वर्षीय भानु गुणाजी पळसमकर यांचा मृतदेह आढळून आला. ते ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३० ते १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ या दरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानु पळसमकर हे घरातून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. अखेर १३ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या कोडवी शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
राजापूर वडदहसोळ येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला
