संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर दानिश हॉटेलजवळ असलेल्या अपना चिकन सेंटरसमोरून २५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर २०० आर.एस. मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अबरार अशरफ (वय ३१, रा. आंबेड खर्द, ता. संगमेश्वर) यांची लाल रंगाची बजाज पल्सर (एमएच.०८. एजे. ३५३२) ही मोटारसायकल बंद पडल्याने त्यांनी त्यांचे मित्र चांद खान यांच्या अपना चिकन सेंटरसमोर (सह्याद्री पॅलेसजवळ) १२ एप्रिल रोजी सकाळी लावलेली होती.
१३ एप्रिल रोजी सायंकाळी फिर्यादी आपली गाडी घेण्यासाठी चिकन सेंटर येथे गेले असता, त्यांना त्यांची मोटारसायकल तेथे दिसून आली नाही. चांद खान यांना विचारले असता त्यांनी देखील गाडी नसल्याचे सांगितले. त्यामुळे अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी आपली मोटारसायकल चोरून नेल्याची खात्री फिर्यादी यांना झाली.
याप्रकरणी अबरार अशरफ यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर उभी केलेली दुचाकी चोरीस
