खेड : तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी सिद्धेश एकनाथ उतेकर (२७, मूळ गाव कुरवळ जावळी-आखाडवाडी), रचना राजेंद्र भोसले (३२, आंबडस गवळवाडी, मूळ गाव चोरवणे-गडकरवाडी) यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संतोष रमेश शितोळे (४९, रा. लवले-पुणे) यांनी येथील पोलीस ठाण्योत दिलेल्या तक्रारीनुसार, फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीच्या खिडकीची स्लायडींगची काच सरकवत आतमध्ये बॅगेत ठेवलेले १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. येथील पोलिसांनी सखोल तपास करत दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. अटकेतील दोन्ही संशयितांचा अन्य चोरी प्रकरणात सहभाग आहे का याचा पडताळा पोलिसांकडून केला जात आहे.