मकरंद सुर्वे /संगमेश्वर:-तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस वरदान ठरल्या आहेत. मात्र आजही अनेक ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. प्रवासी शेड उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येतो. ही बाब भाजपच्या सौ. नुपुरा मुळ्ये व श्री. राजेश आंबेकर यांनी राज्याचे माजी सा. बां. मंत्री, भाजपा कार्याध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत सौ. शिल्पा मराठे मॅडम यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मा. चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आंबेड बु. धनगरवाडी येथे प्रवासी निवारा शेडसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. तालुका सरचिटणीस श्री. अमित टाटरे.यांनी शेडसाठी जागा उपलब्ध करून दिली.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे मॅडम, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, सरचिटणीस श्री. अमित केतकर, तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, श्री. बावा नाचणकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, महिला तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, श्री. दादा ढेकणे, श्री. राजेश आंबेकर, श्री. प्रतिक देसाई, श्री. मंगेश साळवी, सौ. सरिता आंबेकर, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह श्री. मराठे, श्री. उन्मेष मुळ्ये तसेच वरकवाडीमधील अन्य ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत शेडच्या लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी मा. रविंद्र चव्हाण साहेब,सौ शिल्पा मराठे मॅडम,सौ नूपुरा मुळ्ये व राजेश आंबेकर आणि सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून आंबेड बु. धनगरवाडी येथे प्रवासी शेडचे लोकार्पण
