रत्नागिरी: रत्नागिरी तालुका आणि शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच वेग धरला आहे. विविध आंदोलने आणि महत्वाचे प्रश्न उचलून तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करून मनसेने आगामी निवडणुकांसाठी आपली तयारी गंभीरपणे सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर, महिला आघाडीला अधिक सक्षम करण्यासाठी शहरात महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबरोबरच तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून नाचणे जिल्हा परिषद गटात खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे:
दत्तात्रय काशिनाथ गुरव: विभाग अध्यक्ष (नाचणे)
रोहित शशिकांत मुलुख: शाखा अध्यक्ष (नाचणे)
अनंत बाबू येडगे: उप शाखा अध्यक्ष (नाचणे)
संकेत मंगेश खत्री: शाखा अध्यक्ष (खेडशी)
प्रणव अनिल घाटकर: गट अध्यक्ष (कारवंचीवाडी)
आशिष कट्टीमणी: उपविभाग अध्यक्ष (कारवंचीवाडी)
राहुल अनिल नलावडे: गट अध्यक्ष (कातळवाडी)
या नवनियुक्ती सोहळ्याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण, शहराध्यक्ष बाबय भाटकर, शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष भाई साळवी, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आणि इतर अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सौन्दळकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात पक्षाच्या ध्येयधोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. या नियुक्त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक जोमाने तयारीला लागला आहे, असे चित्र दिसत आहे.