रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसरे वर्ष,लवकरच होणार पारितोषिक वितरण
रत्नागिरी – युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे ता. कणकवली यांच्यावतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेची रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गांसाठी घेतल्या जाणाऱ्या सदर परीक्षेचे हे 10 वे वर्ष असून रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरे वर्ष आहे. जिल्ह्यातील एकूण 14 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण 4000 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. निवडक यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम तर किमान 112 गुण मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र, मेडल देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इयत्ता सहावी,सातवीतील प्रथम विद्यार्थ्यांना टॅब, निवडक विद्यार्थ्यांना इस्रो सफर आदि भरघोस बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती युवा संदेश प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत,परीक्षा प्रमुख सुशांत मार्गज यांनी दिली.वर्गनिहाय पहिल्या पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे
इयत्ता दुसरी-
प्रथम क्रमांक – विश्वजा वसंत जाधव ( जि प शाळा लांजा नंबर 5 ),
द्वितीय क्रमांक – अविराज महादेव बंडगर( जि प शाळा लांजा नंबर 5 ),
तृतीय क्रमांक स्वरा शंकर बावदाने ( जि प शाळा भालावली नंबर 6 ) चौथा क्रमांक- प्रशिक दत्तात्रय गायकवाड ( जि प शाळा पाचल बौद्धवाडी ),
पाचवा क्रमांक – श्रेयांशु समीर पावसकर ( कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी )
इयत्ता तिसरी –
प्रथम क्रमांक – प्रज्वल पांडुरंग शेजाळ ( जि प शाळा कालगाव नंबर 3 ),
द्वितीय क्रमांक -ध्रुव प्रवीण किंजळसकर ( जि प शाळा तुळसवडे नंबर 1 ),
तृतीय क्रमांक- अनुज अरुण हिरवे ( जि प शाळा पाचल बौद्धवाडी ),
चौथा क्रमांक – हर्ष प्रसाद राऊत (कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी )
पाचवा क्रमांक -पारस विलास मुंडेकर ( कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी )
इयत्ता चौथी – प्रथम क्रमांक- हर्ष सुरेश चांदोरकर ( जि प शाळा चांदोर नंबर 4 ),
द्वितीय क्रमांक -मानस मुकेश सुर्वे (कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी ),
तृतीय क्रमांक- अंतरा राजेश कानर ( जि प शाळा आंबेड बुद्रुक नंबर दोन ),
चौथा क्रमांक- दक्ष कुंदन पवार ( जि प शाळा सोमेश्वर मराठी )
पाचवा क्रमांक – आर्या विशाल मोरे (कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी )
इयत्ता सहावी
प्रथम क्रमांक- अजिंक्य अमर घोसाळकर (रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी )
द्वितीय क्रमांक- अनय विकास पाटील ( सरस्वती विद्यामंदिर पाचल )
तृतीय क्रमांक – शिव समर्थ प्रशांत मुंढे ( विश्वनाथ विद्यालय राजापूर )
चौथा क्रमांक – आराध्या मंगेश धुमक ( जि प शाळा गुजराळी)
पाचवा क्रमांक – आयुष दीपक आयरे ( सरस्वती विद्यामंदिर पाचल )
इयत्ता सातवी –
प्रथम क्रमांक – स्वस्तिक सत्यवान कुळेकर ( सरस्वती विद्यामंदिर पाचल )
द्वितीय क्रमांक – गायत्री संदीप मुंडेकर ( जि प शाळा कोंडये नंबर 2 )
तृतीय क्रमांक- श्रीतेज दीपक माळी ( जि प शाळा सोमेश्वर मराठी )
चौथा क्रमांक – पूर्वा अनिरुद्ध आठले ( जि प पद्मा कन्या शाळा साखरपा )
पाचवा क्रमांक – भक्ती दत्ताराम गोरे ( न्यू इंग्लिश स्कूल लांजा ) परीक्षा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी, उमेश केसरकर, सुहास वाडेकर, विशाल मोरे यांच्यासह सर्व केंद्र संचालक, पर्यवेक्षक, बाह्य निरीक्षक या सर्वांनी विशेष मेहनत घेतली. यशस्वी विदयार्थी, पालक, मार्गदर्शक यांचे सर्वत्र कौतुक होत असून लवकरच पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती कार्यकारिणी सदस्य प्रशांत बोभाटे यांनी दिली.