खेड : खेड बाजारपेठ येथील तीनबत्ती नाक्याजवळ एका निर्जन इमारतीच्या बाजूला मटका जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीला खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री ७.५५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश राजेंद्र पवार (नेमणूक-खेड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी प्रशांत महादेव सुतार (वय २८) हा पुना बाजार पेपरमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावून मटका जुगाराचा खेळ खेळवत असताना पोलिसांना मिळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून प्रशांत सुतार याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १२ हजार रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
खेडमध्ये मटका जुगार खेळताना एकजण ताब्यात
