पो. नि. नितीन भोयर यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांकडून कौतुक
खेड : शासनाच्या शंभर दिवसांच्या कामकाजाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेडमधील महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यालयांना भेट दिली. या वेळी खेड पोलीस ठाण्याची पाहाणी करताना त्यांनी ठाण्याच्या सर्वांगीण विकासावर समाधान व्यक्त केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्यात एकूण २१ नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दालनाचे सुशोभीकरण, कचऱ्याचे शिस्तबद्ध नियोजन, वृक्षारोपण, कंपाऊंडच्या गेटचे नूतनीकरण, रेकॉर्ड रूमची सुसज्जता तसेच स्वागत कक्षाची
निर्मिती यांचा समावेश आहे. विशेषतः महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था केल्याने कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व सन्मानजनक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
या सर्व बदलांमुळे पोलीस ठाण्याचे स्वरूप केवळ आकर्षकच नाही तर कार्यक्षमतेच्या दृष्टीनेही उल्लेखनीय ठरले आहे. हे पाहून जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग स्वतः भारावून गेले. त्यांनी या वेळी उपस्थित प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना देखिल अशा प्रकारे स्वतःच्या कार्यालयांची सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. या पाहाणीदरम्यान खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार सुधीर सोनवणे, तसेच महसूल आणि पोलीस विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. पो. नि. नितीन भोयर यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांवरून कौतुक होत असून हे ठाणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
खेड पोलीस ठाण्याचे रुपडे पालटले
