खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील लोहारमाळनजीक बुधवारी रात्री १०.१५च्या सुमारास आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यात सुनील सुरेश पवार (४१, रा. तांबडभुवण-पोलादपूर) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू मृत्यू झाला. अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सुवर्णा सुनील पवार (३९), श्लोक सुनील पवार (१३), रिया सुनील पवार (१०) अशी जखमींची नावे आहेत. सुनील पवार हे दुचाकीवरुन (एम.एच. ०६ सी.जी. ४९५५) पत्नी व २ मुलांसह लोहारमाळ येथून पोलादपूर येथे जात होते. याचदरम्यान अजित कातवणकर (३५,रा. मिठबाग-देवगड-सिंधुदुर्ग) हा टेम्पो
(एम.एच. ०७ ओ.जे.२२१०) घेवून जात असताना ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार यास अधिक उपचारासाठी घेवून जात असतानाच त्याचे माणगावनजीक निधन झाले.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
