दापोली : दापोली शहरात फिरणाऱ्या अनोळखी अशा एका पुरुष आणि दोन महिला मनोरुग्णांना चिपळूण येथील टीडब्ल्यूजे फाऊंडेशनच्या सौजन्याने प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे.
दापोली शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक पुरुष व दोन महिला मानसिक रुग्ण हे फिरत होते. या मनोरुग्णांमुळे दापोलीकर वैतागले होते. त्यामुळे त्यांनी दापोली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी चिपळूण येथील आशिष कांबळे यांच्या टीडब्ल्यूजे फाऊंडेशनजवळ संपर्क साधला व त्यांच्या मदतीने या मनोरुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. या वेळी महिला पोलीस नाईक खांबे, होमगार्ड पुळेकर, जाधव, महाडिक यांनी या रुग्णांना सुखरूप मनोरुग्णालयात नेण्याची जबाबदारी पार पाडली.
दापोलीतील तीन मनोरुग्णांना प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठविले
