दापोली : तालुक्यातील मांदिवली येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. नवल रघुनाथ वेदफाठक (४५ वर्षे, रा. मांदिवली बाजारपेठ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे १९:१५ वाजता मांदिवली ते मांदिवली बाईतवाडी जाणारे रोडवर झाडीझुडपाच्या आडोशाला नवल वेदफाठक याने देशी संत्रा दारूच्या १८० मिलीच्या २० सीलबंद बाटल्या विनापरवाना आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या दारूची किंमत १४०० रुपये आहे.
याप्रकरणी धनाजी भास्कर देवकुळे (वय ३३ वर्षे) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी नवल वेदफाठक याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोलीत अवैध दारूसाठा बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
