सातारा : महापुरुषांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विरोधात होणाऱ्या कायद्याची १२ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रायगड येथे घोषणा होणार, अशी माहिती खासदार उदयनराजे यांनी दिली.
१२ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल, असे खासदार उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या निवासस्थानी उदय सामंत यांची भेट
उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या दोन्ही निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या सुरुची निवासस्थानी मंत्री सामंत यांचा सन्मान केला. तर खासदार उदयनराजे यांनी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी मंत्री सामंत यांचे स्वागत केले. यावेळी उदय सामंत यांनी सोरटी सोमनाथ या ठिकाणाहून आणलेल्या शिवलिंगाची पूजा केली. सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी आणि आयटी पार्कच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. यासाठी उपस्थित राहणार असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
महापुरुषांच्या अवमानप्रकरणी कायद्याची अमित शहा रायगडावरून करणार घोषणा
