राजापूर: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर रंगणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी दिली.
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्साही व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांना राजा काजवे, आशिष मालवणकर आणि हसन हसोळकर यांच्याकडे आपली नावे नोंदवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही स्पर्धा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली असून, या माध्यमातून क्रीडाप्रेमींना एकत्र आणण्याचा आणि त्यांना एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे मत रवींद्र नागरेकर यांनी व्यक्त केले.