खेड: तालुक्यातील कळंबणी बौध्दवाडी येथे शैलेश प्रकाश कदम (वय ३५ वर्षे) या व्यक्तीने दारूच्या नशेत मोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजता घडली.
याबाबत रमेश तुकाराम बांगर (वय २८ वर्षे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी शैलेश कदम याने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५ (१)(२) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ व ११२/११७ अंतर्गत कायद्याचे उल्लंघन केले आहे.
खेड पोलिसांनी या प्रकरणी शैलेश कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.