मेषमेष
श्रीगणेश म्हणतात, आज सरकारी किंवा वैयक्तिक महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. कुटुंबात आनंद आणि शांतता याला तुमचे प्राधान्य असेल. अचानक खर्चाचा प्रसंग येईल. त्यामुळे आर्थिक ताण जाणवेल. सामाजिक कार्यात काम करताना बेकायदेशीर कृती सहभागी असणार्या लोकांपासून दूर रहा. व्यवसायात नवीन यश तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभवृषभ
श्रीगणेश सांगतात की, कोणताही विशिष्ट प्रश्न परस्पर सहमतीने सोडवता येईल. जुने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. एखाद्या विशिष्ट कामात व्यत्यय आल्याने मित्रावर संशय येऊ शकतो. अनोळखी लोकांशी संपर्क वाढवू नका. तुमच्या कौटुंबिक प्रश्नात बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. व्यवसायात काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. जोडीदाराच्या आरोग्यात चढ-उतार येतील. अति कामामुळे आणि परिश्रमामुळे आरोग्याच्या समस्या जाणवतील.
मिथुनमिथुन
श्रीगणेश म्हणतात की, कुटुंबातील सदस्यांसोबत समस्येवर संवादातून तोडगा काढा. एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होऊ शकते. भाऊ आणि नातेवाईकांमध्ये सुरू असलेला वाद एखाद्याच्या मध्यस्थीने सोडवता येईल. अनेक बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, याची जाणीव ठेवा. व्यावसायिक कामांमध्ये काही समस्या उद्भवू शकतात. घर-कुटुंब आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राखला जाईल. तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
कर्ककर्क
श्रीगणेश सांगतात की, मुलाशी संबंधित कोणतेही विशेष काम पूर्ण केल्याने आराम मिळेल. वैयक्तिक कामांकडे पूर्ण लक्ष द्या. पैशाच्या व्यवहारात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अनावश्यक खर्च देखील कमी करा. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व्यवसायातील क्षेत्राशी संबंधित योजनेवर गांभीर्याने काम करा. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील.
सिंहसिंह
श्रीगणेश म्हणतात की, मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल. तुम्हाला एखाद्या समस्येवर योग्य सल्ला मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. व्यवसायातील मंदीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्च कमी करावा लागू शकतो. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायात अत्यंत साधेपणा आणि गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. पती-पत्नीमधील नाते गोड असू शकते. आरोग्य चांगले राहील.
कन्याकन्या
श्रीगणेश सांगतात की, कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. आर्थिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे मात्र तुमचे उपक्रम गुप्त ठेवणे चांगले. पैशाच्या बाबतीत नातेवाईकांशी व्यवहार करताना, संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्या. व्यवसायाबाबत कोणतीही कृती फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा.
तूळतूळ
श्रीगणेश म्हणतात की, फोन कॉलद्वारे एक महत्त्वाची सूचना मिळू शकते. यावर त्वरित अंमलबजाणवी करणे योग्य ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ जाईल. भविष्यातील कोणत्याही योजना बनवताना तुमच्या निर्णयांना प्राधान्य द्या. इतरांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. जोडीदाराचा पाठिंबा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिकवृश्चिक
श्रीगणेश सांगतात की, चुकीच्या कामांकडे लक्ष न देता तुमच्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही दीर्घकालीन चिंता आणि तणावातून मुक्तता मिळू शकते. काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंचा विचार करा. जमीन खरेदीशी संबंधित कामांमध्ये जास्त फायदा होण्याची अपेक्षा करू नका. रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायातील क्षेत्राशी संबंधित योजना सुरू करण्यासाठी हा योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
धनुधनु
श्रीगणेश म्हणतात की, आजचा बहुतांश वेळ घरगुती कामात जाईल. धार्मिक संस्थेशी संबंधित कामांमध्ये देखील योगदान द्याल. आळस टाळा. तुमचा संशयास्पद स्वभाव तुमच्यासाठी आणि इतरांसाठी त्रास निर्माण करू शकतो. वेळेनुसार तुमचे वर्तन बदला. तुमच्या नव्या योजना आणि उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
मकरमकर
तुमचे विशेष योगदान जवळच्या नातेवाईकाच्या समस्येचे निराकरण करण्यात असेल. तुमच्या हुशारीची आणि क्षमतेची प्रशंसा केली जाईल. आज तुम्हाला काही शुभ सूचना मिळू शकतात. काही लोक तुमच्यासाठी त्रास देऊ शकतात. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सुसंवाद राखणे आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहील. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आरोग्याबाबत समस्या येणार नाही.
कुंभकुंभ
श्रीगणेश सांगतात की, मनोरंजन आणि कुटुंबासोबत खरेदीसारख्या कामांमध्ये आनंददायी वेळ व्यतित कराल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्टिकोनातून विशेष सकारात्मक परिणाम मिळणार नाही. त्यामुळे निराशेची भावना असेल. व्यवसायात प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित योजनांचे ज्ञान तुम्हाला मिळेल. पती-पत्नी एकमेकांच्या माध्यमातून समस्येवर उपाय शोधतील.
मीनमीन
घराची साफसफाई आणि इतर कामांमध्ये वेळ जाईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत बसून तुमच्या भावना व्यक्त करा. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने तुमच्या समस्या सुटतील. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. व्यवसायाशी संबंधित प्रकल्पाबाबत समस्या उद्भवू शकते. पती-पत्नी एकमेकांच्या सामंजस्याने योग्य व्यवस्था करतील. धोकादायक कामे टाळा, असा सल्ला श्रीगणेश देतात.