संगमेश्वर: संगमेश्वरच्या पैसाफंड हायस्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी क्रिशा कपिल इंदानी हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून संगमेश्वरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संगमेश्वर (नावडी) येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर आणि माजी सैनिक पालक दिनेश आंब्रे यांनी तिच्या माभळे येथील निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ आणि शालेय साहित्य देऊन तिचा सत्कार केला.क्रिशाने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि आत्मविश्वासपूर्ण शैलीने परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.क्रिशा इंदानीच्या या यशाने संगमेश्वरच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
या सत्कार समारंभाला शिक्षिका श्रद्धा शिवराम जोशी आणि क्रिशाची आई अपर्णा कपिल इंदानी उपस्थित होत्या.
संगमेश्वरच्या क्रिशा इंदानीची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाजी; सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे सन्मान
