संगमेश्वर : तालुक्यातील पाटगाव कुंभारवाडी येथील मंगेश शंकर बारगुडे (वय 39) यांचा कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्च 2025 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास मंगेश यांना अचानक फिट आली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये 22 मार्च 2025 रोजी मंगेश यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 27 मार्च 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात 2 एप्रिल 2025 रोजी रात्री 9.39 वाजता झाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संगमेश्वर : फिट आलेल्या तरुणाचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू
