राजापूर : तालुक्यातील पाचल बाजारपेठेत सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओणी ते कोल्हापूर रोडवर घडली. एकनाथ शांताराम गुडेकर (५७, रा. मिळंद, गुरववाडी, ता. राजापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.