लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर करणार तपासणी
खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचा ६७व्या वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणे, साधना फाउंडेशन मुंबई, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद यांच्या विशेष सहकार्याने आणि शाळा विकास समिती व शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने रविवार (६ एप्रिल) भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी येथे होणार असून, यात रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.
या शिबिरात कर्करोग तज्ज्ञ (कॅन्सर), नेत्र रोग तज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ (हार्टचे आजार), त्वचारोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ (हाडांचे आजार), पॅथॉलॉजी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन्स, बालरोग तज्ज्ञ, मेमोग्राफी, दंत चिकित्सक, इसीजी, कान, नाक, घसा रोग तज्ज्ञ, PAP-Smear, मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विविध आजरांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तब्बल ५ लाखपर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार मोफत असणार आहे. अत्यंत तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून रुग्णांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वाटद कवठेवाडी शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी अप्पा धनावडे (९४२००५२५५३), अमित वाडकर (९६६५४८८१४४), विलास बारगुडे (७०३८५१८६७८), रमेश तांबटकर (८६९८५२५८९४), प्रभाकर धोपट (८१४९२३७२७९), पंकेश धनावडे (७८७५११५९७५), विश्वनाथ कुर्ते (९५९४८७७५८७), विश्वनाथ शिर्के (८८८८७६६७४६), विश्वास बारगुडे (९१५८०७१३४६), संजय शितप (८८८८९२२३८१), मारुती कुर्ते (९६०७७८५१९१), सौ. सुजाता लोहार (७०८३२४४७६३), माधव अंकलगे (९०२१७८५८७४), श्रीमती राधा नारायणकर (८८५०३५८८३८) यांच्याशी संपर्क साधावा.