रत्नागिरी : कुवारबावच्या उत्कर्ष नगरातील वयोवृद्ध रहिवासी श्रीमती कमल भगवान मराठे यांनी निरोगी आयुष्य जगून वयाची १०२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांच्या हस्ते आज त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक शामसुंदर सावंतदेसाई, कार्यकारिणी सदस्य सुधाकर देवस्थळी, डॉ. मनोहर चांडगे, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर, कार्यवाह सुरेश शेलार, महिला प्रतिनिधी सौ. शुभांगी भावे आणि सौ. सुवर्णा चव्हाण उपस्थित होत्या.
सत्कारमूर्ती श्रीमती कमल मराठे यांनी सुसंस्कृत मराठे कुटुंबीयांना एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून ठेवण्याची किमया केली असून आजही घरातील सर्व कामे त्या स्वतः करीत असतात. त्यांना दीर्घायुष्य आणि निरामय आरोग्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मराठे कुटुंबीयांनी ज्येष्ठांचे स्वागत करून आजींच्या सत्काराच्या या हृदयस्पर्शी उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शंभरी पूर्ण केलेल्या कमल भगवान मराठे यांचा सन्मान
