मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या गाड्या आता ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार आहेत.
गाड्यांची माहिती:
गाडी क्रमांक 12134: मंगळुरू ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाडी आता १५ एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार आहे.
गाडी क्रमांक 22120: मडगाव जंक्शन-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस ही गाडी १५ एप्रिलपर्यंत दादरपर्यंतच धावणार आहे.
गाडी क्रमांक 12052: मडगाव-मुंबई दैनंदिन जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडीही १५ एप्रिलपर्यंत दादरपर्यंतच धावणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या बदलाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.