नाटे सडा पेठ येथे काही काळ तणावाची परिस्थिती..
नाटे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर मिळवले नियंत्रण
राजन लाड/जैतापूर:-राजापूर तालुक्यातील नाटे येथे गेल्या काही दिवसांपासून जडीबुटी आणि आयुर्वेदिक उपचार करणारी एक गाडी उभी होती . येणाऱ्या जाणाऱ्या कडून आयुर्वेदिक आणि जडीबुटी औषधोपचाराच्या नावाखाली पैसे घेतले जात होते.
अशाच प्रकारे साखरी नाटे येथील एका युवकाकडून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली जवळपास 80 ते 85 हजार रुपये लाटण्यात आले होते. त्याच्याकडून अजूनही 40 ते 45 हजार रुपयाची मागणी केली जात होती. आणि पैसे नसल्यास किमान अर्धा तोळे सोने घेऊन या असे सांगितले होते.आणि हे औषध घेत असताना किंवा उपचार चालू असताना कोणालाही काही समजता काम नाही असे हे सांगण्यात आले होते.
45 हजार रुपये नसल्यामुळे त्या युवकाने आपल्याच एका नातेवाईकाकडे मागणी केली होती. त्या नातेवाईकाच्या माध्यमातून घरच्या लोकांना तसेच काही मित्रांना समजल्यावर त्यांनी व्यवस्थितपणे सापळा रचून जडीबुटी विकणाऱ्या या लोकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना अरेरावी आणि उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. जमावातून काहींनी त्यांना येथेच प्रसाद देण्याचाही प्रयत्न केला मात्र नाटे पोलिसांना ही गोष्ट समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
नाटे भागात सुरू असलेली ही विक्री तात्काळ थांबवायला भाग पाडली. आणि फसवणूक झालेल्या त्या युवकाचे पैसे त्याला देण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर या परिसरात पुन्हा गाडी लावायची नाही अशी ही तंबी देण्यात आली.
आपल्याला अनेक ठिकाणी अशा प्रकारे जडीबुटी किंवा आयुर्वेदिक औषधे विक्री आणि उपचार करणाऱ्या गाड्या निदर्शनास येतात अशांकडून कोणतेही उपचार करून घेत असताना किंवा औषधे घेत असताना खात्री केल्याशिवाय घेऊ नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.
नाटे येथे व्यवसाय करणाऱ्या या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे जडीबुटी किंवा आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी आवश्यक परवाना किंवा सर्टिफिकेट नसल्याचेही आढळून आले.
स्थानिक प्रशासनाने तसेच पोलीस पाटील यांनी दक्ष राहून आपल्या गावात विनापरवानगी व्यवसाय करणाऱ्या अशा व्यवसायिकांवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत ही या निमित्ताने व्यक्त होत आहे.
नाटे साखरी नाटे येथील जागृत ग्रामस्थांमुळे फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला असून जिल्ह्यात कुठे कुठेही अशा प्रकारे तुला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
नाटे येथे जडीबुटी देऊन हजारो रुपये लाटणाऱ्यांचा प्रयत्न जागृत ग्रामस्थांनी हाणून पाडला
