गावखडी/वार्ताहर:- रत्नागिरी आगारातून चालू असलेली डोर्ले हर्चे परेल गाडी पुन्हा कोकण वासियांच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे कोकणात येण्यासाठी चाकरमानी मुंबईकर तसेच कोकणातून जाणारे गावकरी या सर्वांना सुलभ अशी डोर्ले हर्चे परेल गाडी सोईची अशी होती परंतु काही काळंतराने ही गाडी बंद करण्यात आली त्यामुळे कोकणातील लोकांची गैरसोय होत आहे सर्वांना सुलभ अशी व नेहमी चालणारी गाडी अचानक बंद झाल्याने जनतेमध्ये नाराजी आहे आता कोकणात येणारे चाकरमानी तसेच कोकणातून आंबा काजूचे पार्सल घेऊन जाणारे लोक त्या गाडीची आतुरतेने वाट पाहत आहेत आता कोकणात सणासुदीचे दिवस चालू झाले असून ती गाडी चालू व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तरी याचा सारासार विचार करून रत्नागिरी आगाराने जनतेच्या सोयीसाठी डोर्ले हर्चे परेल गाडी पूर्ववत चालू करावी अशी मागणी संतोष पोकडे यांनी पुन्हा केली आहे.