शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात तहसिल कार्यालयाचा उपक्रम
मंडणगड/प्रतिनिधी: राज्यशासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत मंडणगड तहसिल कार्यालयाच्या वतीने व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जनतेच्या सेवेसाठी शासनाच्या माध्यमातून कृती कार्यक्रम सुरु आहे.
लोकांचा वेळ व पैसे वाचवण्यासाठी मंडणगड तहसिल कार्यालयाच्या वतीने मोबाईल व्हॉट्सअँप क्रमांकावर अर्जदार नागरीकांच्या तहसिल कार्यालयाशी संबंधीत असणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे. दापोली महसुल उपविभाग अंर्तगत हा व्हॉट्सअप ग्रुप व चँनल तयार करण्यात आले आहे. त्यावर राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शासकीय योजना विविध उपक्रम यांची माहीती देण्यात येणार आहेत. हा चँनल फॉलो करुन नागरीकांनी घरबसल्या ही माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंडणगडचे तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक करणार
