आता दिवसाला केवळ एवढेच फोटो तयार करता येणार
नवी दिल्ली:- सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते.
भारतातही सायंकाळी दीड तास बंद होते. त्यामुळे अखेर कंपनीने इमेजेस बनविण्यावर निर्बंध घातले आहेत. आता फ्री व्हर्जन युजर्सना एका दिवसात केवळ ३ इमेजेस तयार करता येतील.
या काळात डाउनडिटेक्टरमध्ये आउटेजच्या अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या. ओपन एआयने सर्व्हिसेस रीस्टोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. सर्व सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर कंपनीने पाच दिवसात यामागच्या कारणांचा अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले आहे.
नेमके काय झाले?
युजर्समध्ये सध्या जीपीटी-४ओची नवीन अपडेट स्टुडिओ गिबलीची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. यात युजर्सना आपले ॲनिमेटेड फोटो तयार करून मिळतात. असे फोटो तयार करून युजर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करणे सुरू केले. कोट्यवधी युजर्सनी यात एकाचवेळी सहभाग घेतल्याने चॅटजीपीटीवर अचानक ताण वाढला. त्यामुळे पुढे आऊटेज झाले.
आता ब्रेक घ्या, टीमला झोप हवी
फीचरची मागणी वाढल्याने ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एक्सवर वर पोस्ट केले, कृपया इमेज तयार करण्यामध्ये ब्रेक घ्या, टीमला झोपेची गरज आहे. इमेज जनरेटरमुळे सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. आमचे जीपीयू वितळत आहेत. इमेज जनरेटरवर तात्पुरती मर्यादा लावत आहोत. सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
हा जीवनाचा अपमान; संस्थापकांची टीका
घिबली आर्टचे जनक स्टुडिओ घिबलीचे संस्थापक हयाओ मियाजाकी यांनी एआयच्या जनरेटेड इमेजेसवर टीका केल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. त्यात हयायो यांनी म्हटले आहे की, मी कधीही माझ्या कलेत हे तंत्रज्ञान स्वीकारणार नाही. हा जीवनाचा अपमान आहे. माणूस अनुभव, वेदना, आनंद चित्रे व कहाण्यांमध्ये उतरवत असतो. परंतु, एआय ॲनिमेशन यापासून कोसो दूर आहे. एआय जनरेटेड इमेजवर त्यांनी ही टीका २०२६ मध्ये केलेली आहे.