आ. शेखर निकम यांच्या पत्राला सकारात्मक उत्तर
चिपळूण (प्रतिनिधी):-आमदार शेखर निकम यांनी आपल्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात असलेल्या रेल्वे स्थानकांतील प्रश्न, उपाययोजना आणि जलद गाडयांच्या थांब्याबाबत कोकण रेल्वेकडे पत्रव्यवहार केला होता. आमदार निकम यांच्या पत्रातील मागण्यांची दखल घेत केल्या जाणाऱ्या कार्यवाही व उपाययोजनांचा खुलासा कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी आमदार शेखर निकम यांना पाठवलेल्या पत्रात दिले आहे.
चिपळूण स्थानकावर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाया एकुण गाड्यांपैकी सुमारे ९ एक्स्प्रेस व १४ सुपरफास्ट गाड्या नियमित, साप्ताहीक व द्वि-साप्ताहीक तत्वावर थांबविल्या जातात. रेल्वे स्टेशन पासुन बाजारपेठ पर्यंतच्या भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी तांत्रिक दृष्ट्या शक्यतेबाबत परिक्षण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर संगमेश्वर स्थानकात प्लैटफॉर्म क्रमांक १ वरून प्लैटफोर्म क्रमांक २ वर जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी एक ओव्हर ब्रीज उपलब्ध असला तरी अतिरीक्त ओव्हर ब्रीज निर्मितीविषयीचा निर्णय निधीच्या उपलब्धतेनुसार सक्षम अधिकाऱ्यांच्या मार्फत घेतला जाईल. प्लैटफॉर्म क्रमांक १ वर पेव्हर ब्लॉकच्या डागडुजीचे कार्य अभियांत्रीकी विभागातर्फे लवकरच हाती घेतले जाईल. तर प्लैटफॉर्म क्रमांक २ वर नव्याने पेव्हर ब्लॉक बसविण्याविषयीची कार्यवाही निविदा स्तरावर असून ते लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल.
सावर्डे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असणाऱ्या ओव्हर ब्रीज (एफ़ओबी) साठी अंदाजे २.७ करोड तसेच उच्च स्तरीय प्लेटफार्म च्या निर्मितीसाठी अंदाजे १.२८ करोड एवढा निधी आवश्यक आहे. यासाठी संबधित विभागातर्फे निरीक्षण करून निधीच्या उपलब्धतेनुसार सक्षम अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्याबरोबर कोणत्याही गाडीला देण्यात येणाऱ्या थांब्याविषयीचा निर्णय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घेतला जातो. त्यामुळे सध्यस्थितीत सावर्डे स्थानकात तीन गाड्याना थांबे देण्यात आलेले आहेत. तसेच गणपती, होळी किंवा सुट्टीच्या काळात या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या बहुतांश गाड्यांना येथे थांबे देण्यात येत आहेत. मांडवी, मत्स्यगंधा या गाडयांना थांबा देण्याविषयीची कोकण रेल्वेच्या मुख्यालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याचे नमुद केले आहे.
कडवई रेल्वे स्थानकामध्ये स्थानिक रिक्षा व्यवसायिकांसाठी रिक्षा स्टॅण्डसाठी जागा मंजूर करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवह्यन अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. त्या संदर्भात सर्वेक्षण करुन आवश्यक जागा उपल्ब्ध करुन देण्यात होईल. या स्थानकावर उच्च स्तरीय प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी अंदाजे १ कोटी २८ करोड खर्च अपेक्षित आहे. त्याबरोबर गाडयांच्या थांब्याचा निर्णय हा वरीष्ठस्तरावर असल्याचे म्हटले आहे.
पूर्वी सुरु असलेली रत्नागिरी दादर रत्नागिरी ही गाडी पुर्ववत दादर स्थानकापर्यंत विस्तार करण्याविषयीचा निर्णय रेल्वे मंत्रालय व मध्य रेल्वे यांच्या मार्फत घेतला जाणार आहे. त्याबरोबर विविध गाड्यांच्या आरक्षण कोट्यामध्ये विस्तार करण्याविषयीचा प्रस्ताव कोकण रेल्वेच्या मुख्यालयात विचारार्थ तसेच पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. गणपती विशेष गाडी कायम स्वरुपी करण्याविषयीची आपली मागणी पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे.
कळंबस्ते रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल निर्मितीसाठी सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकानुसार सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. सदर उड्डाणपूल निर्मितीचे कार्य राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भूसंपादन प्रक्रियेसह आणि निधिच्या उपलब्धतेनुसार पुर्ण करण्याचे प्रयोजन आहे.
कोकण विभागामध्ये आंबा सिझन मध्ये आंबा वाहतुक करणेसाठी या भागातील आंबा व्यापारी यांजकडुन मागणी आल्यास त्यांच्या मागणीनुसार रेल्वेच्या मापदंडाप्रमाणे स्पेशल मँगो पार्सल व्हॅन ची सुविधा पुरविण्यास कोकंण रेल्वे कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.
कोकण रेल्वे स्थानकातील प्रश्न, उपाययोजना व गाड्यांच्या थांब्याबाबत कोकण रेल्वेकडून खुलासा
