खेड:-घराच्या बाजूला असलेल्या नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा झाडावरून कोसळून मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी सकाळी ११ ३० वाजण्याच्या सुमारास दयाळ कांजरकोंड येथे घडली
नितीन शांताराम झाडेकर रा कुंभवे सुतार वाडी मूळ गाव दयाळ कांजरकोंड असे त्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे घराच्या जवळ असलेल्या नारळा च्या झाडावर नारळ काढत असताना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला त्याला तत्काळ दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी दाखल करण्यात आले मात्र त्यास मयत घोषित करण्यात आले
या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे
खेड: माडावरून पडून तरुणाचा मृत्यू
