नवी दिल्ली:- आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच दिलासादायक बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ४१ रुपयांनी कमी करण्यात आला आहे, जो आजपासून (दि.१) लागू होईल. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १७६२ रुपये असेल.
इतर शहरांमध्ये किती किंमत?
दिल्ली व्यतिरिक्त, इतर शहरांमध्येही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
कोलकाता : आता १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १८७२ रुपयांना उपलब्ध होईल, पूर्वी त्याची किंमत १९१३ रुपये होती.
मुंबई : येथे आता या सिलिंडरची किंमत १७१४.५० रुपये असेल, जी पूर्वी १७५५.५० रुपये होती.
चेन्नई : आता व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत १९२४ रुपये झाली आहे, तर पूर्वी ती १९६५ रुपये होती.
घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असूनही, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर दिल्लीत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच दिलासा; LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त, आजपासून नवीन दर लागू
